Home अहमदनगर अश्लील व्हिडिओ काढून प्रियकरानेच केलं ब्लॅकमेल; अहमदनगरमधील महिलेनं उचललं टोकाचं पाउल

अश्लील व्हिडिओ काढून प्रियकरानेच केलं ब्लॅकमेल; अहमदनगरमधील महिलेनं उचललं टोकाचं पाउल

Ahmednagar News:  प्रियकराने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने शहरातील एका महिलेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Woman committed suicide by hanging herself

शेवगाव: अहमदनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने शहरातील एका महिलेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.. याप्रकरणी महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून शेवगाव पोलिसांनी प्रियकर आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिलेनं आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या महिलेनं पतीशी फारकत घेतली होती. यानंतर तिचे प्रशांत गुटे नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तो महिलेच्या घरी येत जात होता. प्रशांत गुटे याने तिथेच महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ काढले. दरम्यान गुटे याचे अन्य एका महिलेसोबतही प्रेमसंबंध होते.

त्या महिलेने संबंधित महिलेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ महिलेच्या भावाला पाठवले. त्यानंतर त्यांनी भावाला घरी बोलावलं. मात्र त्याने येण्यास नकार दिला. यानंतर तुमची बदनामी करेल, अशी धमकी दोघांनी महिलेच्या भावाला दिली. भावाने त्या व्हिडिओमध्ये बहिणीला विचारणा केली. मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल समजताच संबंधित महिलेनं आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी महिलेचा प्रियकर प्रशांत गुटे आणि त्याची दुसरी प्रेयसी असलेल्या आरोपी महिलेच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Woman committed suicide by hanging herself in her house after her boyfriend threatened to make the obscene video viral

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here