Home अकोले अकोले : बेमुदत महाविद्यालय बंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन...

अकोले : बेमुदत महाविद्यालय बंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र – संदेश कासार

अकोले : बेमुदत महाविद्यालय बंद आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र – संदेश कासार

अकोले: शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत मा. शिक्षणमंत्री कोणतेही ठोस आश्वासन द्यायला तयार नाहीत. 
त्यामुळे MFUCTO ने पुकारलेले ‘बेमुदत महाविद्यालय बंद आंदोलन’ सुरूच राहील व आणखी तीव्र करण्यात येईल.
महाविद्यालय बंदमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला आता मा. शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन हे जबाबदार असतील.
MFUCTO हि तशी अनुदानित प्राध्यापकांची संघटना आहे. परंतु, विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी, उच्च शिक्षणाचा होत असलेला खेळखंडोबा थांबविण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळवून देण्यासाठी संघटना आंदोलनात उतरली आहे.
आंदोलन ‘विनाअनुदान धोरण’ या विषयाशी निगडित असल्याने राज्यभरातील विनाअनुदानित प्राध्यापकांनी यात उतरणे आवश्यक आहे. बरेच उतरलेही आहेत. परंतु, विनाअनुदानित प्राध्यापक म्हणजे असंघटित कामगार आहे. संस्था, सरकार यांना तो घाबरून असतो. काही महाविद्यालयांचे प्राचार्य, काही संस्थाचालक यांचा विनाअनुदानित प्राध्यापकांवर दबाव आहे. आंदोलनात सहभागी झाले तर कामावरून काढू टाकू, भविष्यात अनुदानीतवर येऊ देणार नाही असे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संदेश पोचवण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही सहभागी होऊ शकत नाही. आता कसेतरी अर्धा घास पोटात जातो आहे. भविष्यात तोही हिरावला जाईल ही भीती आहे. परंतु, आंदोलन संपूर्ण क्षमतेने झाले नाही, तीव्रतेने झाले नाही तर सरकार ते गुंडाळण्याची जास्त शक्यता असते. आणि आंदोलन गुंडाळले गेले तर भविष्य अंधकारमयच राहणार आहे. त्यामुळे या दबाव असलेल्या शिक्षकांनी प्राचार्य, संस्थाचालक यांचा दबाव झुगारून द्यावा व आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी उतरावे. वेळप्रसंगी MFUCTO आपल्याला मदत करायला तयार आहे.
आंदोलनात सहभागी न झालेल्या प्राध्यापकांच्या इतर संघटना, विद्यार्थी संघटना, पालक यांना सर्वांना आवाहन आहे की आपणही आमचे प्रश्न समजून घ्यावेत. पगार नसतानाही इमान इतबारे अध्यापनाचे काम करून भविष्यातील पिढी घडविण्याचे काम आम्ही करत आहोत. चांगल्या आयुष्याची आम्ही अपेक्षा ठेवली तर ती गैर आहे का? आम्हीही माणूस आहोत. आम्हालाही स्वप्ने आहेत. त्यामुळे आमच्या आंदोलनाला नुसता पाठींबाच नाही तर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण सक्रिय सहभागी होण्याची आवश्यकता आहे.
एक हिंदी कवी फार छान म्हणतो,
तय करो किस ओर हो तुम,
तय करो किस ओर हो तुम,
आदमी की पक्ष में हो या आदमखोर हो तुम।
आपण सर्वांनी माणुसकीच्या भावनेतून या आंदोलनाचा विचार करावा हीच अपेक्षा!

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here