Home अकोले अकोले: खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत इंदोरीत शुक्रवारी ऊस व दुध परिषद

अकोले: खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत इंदोरीत शुक्रवारी ऊस व दुध परिषद

अकोले: खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत इंदोरीत शुक्रवारी ऊस व दुध परिषद

अकोले: केंद्रात व राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी नगर जिल्ह्यात मात्र साखर सम्राटांचेच राज्य आहे. एकीकडे रात्रंदिवस शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे हुकुमशाही पद्धतीने वागत ऊस व दुधाच्या भावाबाबत सरकारकडे बोट करायचे असा नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांचा कारभार सुरु असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी केला.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

अकोले तालुक्यातील इंदोरी फाटा येथे दि. २८ सप्टेंबर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जिल्हा ऊस व दुध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोपळे, हंसराज वडघुले, रसिका ढगे, शर्मिला येवले,आदी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंत म्हणाले,राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे दुधाला पाच रुपये भाव वाढ मिळाली. तरीही नगर जिल्ह्यातील साखर सम्राटांचे सहकारी दुध संघ भाव द्यायला तयार नाहीत. सरकारने साखर कारखाने, दुध संघ अडचणीत आणल्याचे ते सांगतात. काँग्रेस राष्ट्रवादी च्या ताब्यात साखर संघ सर्वाधिक साखर कारखाने आहेत. साखर संघ व कारखाने मिळून महाराष्ट्राच्या पातळीवर सरकार विरोधात संघर्ष करण्याचे पत्र राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा त्यात उल्लेख होता परंतु एका बाजूला सरकारच्या धोरणावर टीका करीत असताना केवळ पदयात्रा सोडल्या तर कुठलाही ठोस मुद्दा घेऊन सरकार विरोधात आंदोलन झाले नसल्याचे सावंत म्हणाले. यावेळी शरद नाना थोरात, दिलीप कडलग, चंद्रकांत नेहे, भरत नवले, सचिन वर्पे,सुभाष येवले आदी उपस्थित होते.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here