Home अहमदनगर कॉंग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी रहायची वेळ आली: मंत्री बाळासाहेब थोरात

कॉंग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी रहायची वेळ आली: मंत्री बाळासाहेब थोरात

Ahemednagar Balasaheb Thorat criticism on opposition 

Balasaheb Thorat | अहमदनगर: काहीना असे वाटले की भाजपात गेले की मंत्रीपद मिळतात. जे डावपेच करतात तेच फसतात. कॉंग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी रहायची वेळ आली अशी सणसणीत टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव ण घेता विरोधकांवर केली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रस संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते. थोरात म्हणाले आम्ही कठीण काळातही कॉंग्रस सोडली नाही.म्हणून आज माझ्याकडे मंत्रिपद आहे. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे. विरोधकांनी कोन्ग्रेस पक्ष सोडला आणि त्यांच्यावर पायरीवर उभी राहण्याची वेळ आली आहे. डावपेच करत असताना स्वतःच फसतात.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार भाजपा समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. नोटबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढ यामुळे अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. पेट्रोलचा भाव एक रुपयाने वाढले तरी आंदोलन करणारे भाजपवाले आता गप्प का आहेत. कृषी कायद्याने महागाईचा भडका पेटणार आहे.  

Web Title: Ahemednagar Balasaheb Thorat criticism on opposition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here