Home अहमदनगर पेट्रोल दरवाढ, महंगाइ, आजच्या ‘बंद ला’  संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा...

पेट्रोल दरवाढ, महंगाइ, आजच्या ‘बंद ला’  संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा पाठिंबा

आजच्या बंद ला संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा पाठिंबा

अहमदनगर : –  ‘अच्छे दिन’ चे गाजर दाखवत भारतीय जनता पार्टीने  २०१४ लोकसभा निवडणुकपुर्वी महागाई कमी करु, असे खोटे आश्वासन देवुन भारतीय जनतेची फसवणुक केली. सत्तेत आल्यावर मात्र महागाई कमी करण्यापेक्षा अनेक करांच्या माध्यमातुन पेट्रोल-डिझोल, घरगुती गॅस व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढीतुन जनतेची लुठ केली. त्यामुळे सामान्य जनेतेच  कंबरडे मोडुन , अर्थकारण कोलमडले. यामध्ये छोटे उद्योग , माध्यम उद्योग , त्यात व्यापार उद् ध्वस्त झाला. आजच्या देशव्यापी ‘बंदला’ संभाजी बिग्रेड व मराठा सेवा संघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

नोटबंदी व जीएसटीमुळे सर्वसामान्य माध्यम वर्गाचे कौटुबिंक बजट कोलमडले आहे. आरोग्य-शिक्षण यावरचा खर्चही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये सरकारविरुध्द प्रचंड रोष‍ निर्माण झाला आहे. भाजप-सेनेच्या सरकारच्या काळात महागाईचे आगडोंब उसळला असनु, अजुनही प्रधानमंत्री पेट्रोल-डिझेल पंपावर स्व:ताची जाहिरात करत आहेत. सध्याही दररोज पेट्रोल-डिझलचे दर वाढत आहेत.  त्यामुळे मोदी सरकारला स्वत:ची जाहिरात करण्याचा कोणतीही नैतिक अधिकार  राहिलेला नाही. वाढत्या महागाईच्या विरुध्द घेतलेल्या ‘भारत बंद’ ला जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती मनोज आखरे व इंजि. अभिजित वाघ यांनी दिली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here