Home संगमनेर संगमनेर: माहुली शिवारातील दरीत कार कोसळली ;  एक ठार

संगमनेर: माहुली शिवारातील दरीत कार कोसळली ;  एक ठार

माहुली शिवारातील दरीत कार कोसळलीएक ठार

संगमनेर: – संगमनेर तालुक्यातील नाशिक महामार्गावर असणाऱ्या नविन माहुली शिवारात खोल दरीत इको कार कोसळुन एक जण जागीच ठार झाला असुन  असुन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. संजय मधुकर साळवे (वय ४५, रा. रमाबाई नगर, पिंपरी-चिंचवड , पुणे) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय साळवे व त्यांचे जोडीदार सयाजी बाबुराव वाळुंज व सचिन बाळु मुठे (दोघे रा. सदगुरुनगर, भोसरी, जि. पुणे) हे तिघे जण इको कार क्रमांक एमएच १४ एफसी १४८७ हिच्यामधुन देवदर्शनासाठी शनिवारी दि.८ सप्टेंबर रोजी श्रीरामपुर या ठिकाणी आले होते. रविवारी सकाळी संगमनेर मार्गे पुण्याच्या  दिशेने चालत होते. सकाळी जुन्या एकल घाटाच्या नविन माहुली शिवारातुन महामार्गावरुन जात होते.

त्याच दरम्यान इको कार महामार्गा सोडुन थेट दोन ते तीन पलट्या खात खोल दरीत असलेल्या दगडांवर जावुन जोरदार आदळली. आवाज जोरदार आल्याने आजुबाजुच्या ग्रामस्थांनी लगेच आवाजाच्या  दिेशेन धाव घेतली.  आणि कारमधील जखमींना बाहेर काढले. अपघातात संजय मधुकर साळवे यांना जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. सयाजी वाळुंज व सचिन मूठे हेही दोघे जण गंभीररित्या जखमी झाले होते. तर काहींनी अपघाताची माहिती मोबाईलवरुन रुग्णवाहिका व घारगाव पोलिसांना दिली त्यामुळे घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल ए.आर . गांधले, चालक नामदेव बीरे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली आणि दरीत जावुन ग्रामस्थांच्या मदतीने कारमधुन जखमींना बाहेर काढत रुग्णवाहिकेतुन औषध उपचारासाठी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संजय साळवे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी  संगमनेर कुटीर रुग्णालयात नेण्यात आला आहे.

खोल दरीत कार कोसळल्याने कारचा अक्षरश: चक्काचुर झाला. दैवबलवत्तर असल्याने  इतर दोघे जण बालंबाल बचावले आहे. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अंबादास भुसारे यांनी ही आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात धाव घेत अपघातात जखमी झालेल्या दोघांची विचारपुस केली. त्यानंतर घारगाव पोलिसांनी खोल दरीत असणारी कार क्रेनच्या साहाय्याने वर काढली. रात्री उशिरापर्यंत घारगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालु होते.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here