Home अहमदनगर लॉजरूम मध्ये गैर कृत्य केल्याने दोघांना अटक

लॉजरूम मध्ये गैर कृत्य केल्याने दोघांना अटक

Ahmednagar Both were arrested for misconduct in the lodge

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात पर्वत या लॉजमध्ये रूम मधून चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पर्वत लॉज मध्ये ही घटना घडली आहे. अंकुश शिवहरी काळे व बापू शिवहरी काळे दोघेही रा. मल्हार चौक नगर असे या अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आकाश नवनाथ कवडे रा. दरेवाडी नगर यांनी फिर्याद दिली आहे.  कवडे यांच्या लॉजमध्ये रूम नंबर २०७ थांबले होते. या दोघांनी त्यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड व एटीम चोरत असताना रंगेहाथ पकडले.

या घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे, उप निरीक्षक सतीश शिरसाठ हे पथकासह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कवडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. अधिक तपास पोलीस हवालदार ढगे हे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Both were arrested for misconduct in the lodge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here