धक्कादायक: भावानेच डोक्यात हातोडा घालून बहिणीचा खून
अहमदनगर | Ahmednagar: शहरातील केडगाव येथील शाहूनगर येथे शनिवारी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घरात टी.व्ही. पाहण्याच्या दोघा बहिण भावांमध्ये भांडण होऊन भावाने लहान बहिणीच्या डोक्यात हातोडा खालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रुपाली वय ९ (नाव बदललेले आहे.) असे या मयत मुलीचे नाव आहे. मोठा भाऊ राहुल वय १३ (नाव बदलेले आहे.)
टी. व्ही. पाहण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याने राहुलने घरातील हातोडा रुपालीच्या डोक्यात मारल्याने जागीच मृत्यू झाला. शेजाऱ्यांना ओरडण्याचा आवाज आल्याने घटना समोर आली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती समजताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar brother killed his sister with a hammer in the head