Home अकोले मराठा समाजाला एका महिन्यात आरक्षण मिळाले नाही तर शिवनेरी ते दिल्ली महामोर्चा:...

मराठा समाजाला एका महिन्यात आरक्षण मिळाले नाही तर शिवनेरी ते दिल्ली महामोर्चा: संभाजी दहातोंडे

Akole Maratha Kranti Morcha at Akole on behalf of Sakal Maratha Samaj

अकोले (प्रतिनिधी): केंद्र आणि राज्य सरकारशी लढून हक्काचे आरक्षण मिळवायचे आहे, ते जर झाले नाही तर भावी पिढया माफ करणार नाहीत असा इशारा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला.

अकोले येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षनाच्या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येथील महात्मा फुले चौका पासून घोषणा देत मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात युवक -युवती सहभागी झाले होते. बाजार तळावर पोहचल्यावर तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर होते. सभेत विविध वक्त्यांनी आरक्षण प्रश्नी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी व्यासपीठावर बसण्याऐवजी समोर  उपस्थितांत बसणे पसंत केले.

यावेळी जि प सदस्य ,कैलासराव वाकचौरे, रमेशराव देशमुख,सुषमा दराडे, ऍड के बी हांडे,गिरजाजी जाधव,विठ्ठलराव चासकर,बाळासाहेब भोर, अशोकराव देशमुख, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजने,राजेंद्र डावरे, यशवंत आभाळे, शिवाजी कदम, दिलीप शेणकर, दादापाटील वाकचौरे, आरिफ तांबोळी,  सुरेश खांडगे, संपतराव नाईकवाडी,भानुदास गायकर, जे डी आंबरे, अरुण शेळके, माणिक देशमुख,सोमनाथ नवले, गणेश कानवडे,  प्रदीप हासे, शंभू नेहे,राहुल देशमुख, अशोक आवारी,निलेश तळेकर, अमोल येवले, संगीता शेटे, सोनाली नाईकवाडी,आदी सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते.

माजी मंत्री पिचड म्हणाले की-सगळ्यांच्या भाषणांमधून आक्रोश ऐकला.  आरक्षण प्रश्नी नारायण राणे  समितीत काम करतांना राज्यभर अशाच भावना आढळून आल्या.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पण न्यायालयाने ते नाकारले याचे दुःख असल्याचे ते म्हणाले.मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना आपला पाठींबा आहे. केंद्र व राज्य सरकार निश्चित या मध्ये मार्ग काढील अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठा शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे म्हणाले की, मराठा समाजाला एका महिन्यात आरक्षण मिळाले नाही तर शिवनेरी ते दिल्ली असा महामोर्चा काढला जाईल व प्रसंगी संसदेला घेराव घालण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच ते पुढे म्हणाले की,मराठा समाजाला नेहमीच वंचित ठेवले गेले, साखर सम्राट यांना मराठा समाजाला आरक्षण नको वाटत असल्याचा आरोप केला.

आ.डॉ.किरण लहामटे यांनी महाविद्यालयीन प्रवेशा बाबत सरकार लवकरच योग्य निर्णय घेईल असा दावा केला. राज्य सरकार निश्चित पणे मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे ते म्हणाले.  राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार वैभवराव पिचड  म्हणाले की,मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य असून त्यांच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग देऊ,कोरोनाच्या काळात सुप्रीम कोर्टात चांगला वकील देऊन सुरू असलेल्या लढ्याला न्याय देण्यासाठी आपण मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करायला  तयार आहोत हे स्पष्ट केले व सारथी संस्थेच्या निर्मिती मुळे मराठा समाजातील अनेक तरून अधिकारी बनू शकले मात्र सरकार बदलल्या नंतर ही संस्था बंद पडल्याची खंत व्यक्त केली.

अध्यक्ष स्थानावरून सीताराम पा.गायकर म्हणाले की,शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला असता तर या मराठा आरक्षणाने उचल खाल्ली नसती.यावेळी त्यांनी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना 50 हजार हेक्ट्ररी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी  यावेळी केली.

मराठा समाज हा पोशिंदा आहे.मात्र तोच अद्याप उपेक्षित आहे.राज्य आणि केंद्र सरकारने आरक्षण प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी केली.मराठा समाजातील आमदार-खासदारांची संख्या मोठी आहे मात्र जे आमदार खासदार समाजासाठी काही करत नसतील त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा श्री गायकर यांनी दिला.

माकप चे नेते डॉ अजित नवले म्हणाले की-काश्मीर आणि अयोध्ये सारखे प्रश्न सुटू शकतात पण त्या तुलनेत सोपा असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही असा सवाल त्यांनी केला.

यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी संसदेला घेराव घातला पाहिजे.

मधुकरराव नवले यांनी शिवाजी महाराज यांच्या काळातील काही दाखले देत मराठा आरक्षणाचा लढा विचारपूर्वक देणे आवश्यक असून अठरा पगड जातींना या लढ्यात सहभागी करून घेतले पाहिजे. शिवाजीराजे धुमाळ म्हणाले की, झारीतील शुक्राचार्य हे मराठेच असून तेच आरक्षण मिळवून देण्यास अडसर निर्माण करीत आहे .यावेळी बी जे देशमुख, जालिंदर वाकचौरे,कॉ. कारभारी उगले, विनय सावंत, हभप दीपक महाराज देशमुख, महेशराव नवले, भानुदास तिकांडे, बाळासाहेब  नाईकवाडी,मच्छीन्द्र धुमाळ, ऍड वसंतराव मनकर, डॉ. संदीप कडलग, अनिल झोळेकर, सुरेश नवले, मारुती मेंगाळ, अशोकराव आरोटे, ऍड अनिकेत चौधरी, रेश्मा डावरे, अश्विनी काळे, श्रावणी गोडसे, यांची भाषणे झाली

प्रारंभी  शाहीर मुकुंद भोर,शिवराज भोर ,स्वराज गवांदे व त्यांचे सहकाऱ्यांनी पोवाडा सादर करत वातावरण निर्मिती केली.

प्रास्ताविक व स्वागत राज गवांदे यांनी केले,सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर  आभार अमोल वैद्य यांनी मानले.

शेवटी  प्रातिनिधिक स्वरूपात महिला व  युवती यांच्या हस्ते मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Maratha Kranti Morcha at Akole on behalf of Sakal Maratha Samaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here