Home अहमदनगर अहमदनगर करोना ब्रेंकिंग: जिल्ह्यात धडकी भरणारी आजची कोरोनाची आकडेवारी

अहमदनगर करोना ब्रेंकिंग: जिल्ह्यात धडकी भरणारी आजची कोरोनाची आकडेवारी

Ahmednagar Corona Breaking News 2223 positive

अहमदनगर: एप्रिल महिन्यात एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी ही नागरिकांमध्ये धडकी भरवणारी ठरत आहे. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होत आहे. रोज सरासरी दीड ते दोन हजार करोनाबाधित आढळून येत आहे.

जिल्ह्यात आज तब्बल २२२३ रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरात तब्बल ६११ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कर्जतमध्ये दोनशेपेक्षा अधिक रुग्ण मिळून आले आहेत. त्याखालोखाल संगमनेर, नगर तालुका, अकोले, राहता, पाथर्डी, राहुरी आणि शेवगाव तालुक्यात शतकी पार रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतून ८५९, खासगी प्रयोगशाळेतून ५४९, अँटीजेन चाचणीत ८२५ जणांना करोनाची लागण झाली आहे.

अहमदनगर शहरात ६११, संगमनेर १९८ , राहता ११७, श्रीरामपूर ७९, नेवस५५, पाथर्डी ११७, नगर तालुका १८७, कोपरगाव ९९. अकोले १२८, पारनेर ७०, कर्जत २०१, भिंगार शहर ५४, राहुरी १०७, जामखेड ४७, शेवगाव १०३, श्रीगोंदा ४०, इतर जिल्हा १७, मिलिटरी हॉस्पिटल ६ अशा रुग्णांचा सामावेश आहे.

Web Title: Ahmednagar Corona Breaking News 2223 positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here