Home अहमदनगर पोलीस असल्याचे सांगत एकास ४५ हजारांना गंडा

पोलीस असल्याचे सांगत एकास ४५ हजारांना गंडा

Shrigonda gangsters claiming to be police

श्रीगोंदे | Shrigonda: पोलीस असल्याचे सांगून एका वृद्धास ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदे शहरातील सरस्वती नदीच्या पुलाजवळील खंडोबा मंदिर परिसरात गोविंद शिंदू भोयाटे  रा. शिनदंकर गल्ली हे आराम करीत होते. त्यावेळी त्याठिकाणी अनोळखी दोघेजण दुचाकीवरून येऊन त्यांनी भोयटे यांना सांगितले की, आम्ही पोलीस असून तुमच्या गावात रात्री चोरी झाली. तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या हातात घालू नका. त्या काढून तुमच्या रुमालात ठेवा असे सांगितले. यावरून भोयटे यांनी त्यांच्या खिशातून रुमाल काढत ४५ हजारांच्या अंगठ्या रुमालात बांधून दिल्या मात्र काही वेळाने रुमाल उघडून पाहिले तर त्यात त्यांना सोन्याच्या अंगठ्या आढळून आल्या नाहीत.   

याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिदास झुंजार हे करीत आहे.

Web Title: Shrigonda gangsters claiming to be police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here