Home अहमदनगर पूल खचून रोड रोलर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

पूल खचून रोड रोलर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू

Karjat Driver dies when road roller overturns

कर्जत | Karjat: रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्यावरून रोड रोलर फिरवला जात असताना अचानक पूल खचून रोलर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात रोड रोलर चालकाचा मृत्यू झाला आहे. सुनिलकुमार गौड असे मयत चालकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, कर्जत येथील राशीन रोडवर पाण्याच्या टाकीसमोरून जात असणाऱ्या कर्जत थेरवडी या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरु आहे. हे काम बारामती येथील आदित्य या कंपनीने काम घेतले आहे. या रस्त्यवर ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोळवाडी शिवारात जुन्या पूल परिसरात रोलरने रस्त्यावरील मुरूम दाबण्याचे काम सुरु असताना तिथे असणाऱ्या जुन्या पुलावरून दबई करत असताना पूल कोसळला आणि रोलर खाली उलटा झाला. यावेळी रोलर चालक रोलरखाली दबला आणि रोलरच आवाज आल्याने काही कामगार पळत आले. त्यांनी तातडीने जेसीबी लावून सुनीलकुमार यास बाहेर काढले. उप जिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मयत असल्याचे सांगितले.   

Web Title: Karjat Driver dies when road roller overturns

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here