Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ११ नवीन रुग्ण तर ५ जणांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात ११ नवीन रुग्ण तर ५ जणांना डिस्चार्ज

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज ११ नवीन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या १६३ झाली आहे.

नगर शहरात स्टेशन रोड येथे ३३ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

राहता तालुक्यातील लोणी येथील एक ५६ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह सापडली आहे.

संगमनेर तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. डिग्रस मालुंजा येथील २१ आणि ४५ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

अकोले तालुक्यात तब्बल सहा रुग्ण सापडले आहेत. हे सर्व बाधित व्यक्तींच्या संपर्कातून संक्रमित झाले आहेत. वाघापूर येथील तीन रुग्ण आढळून आले आहेत. ३२ आणि ४० वर्षीय महिला तर ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जांभळे येथील तीन रुग्ण सापडले आहेत. त्यात ४८ व २४ वर्षीय महिला तर २८ वर्षीय बाधित आहे.

जिल्ह्यात आज पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात श्रीरामपूर महादेव वडाळा १, संगमनेर १, पारनेर मसने फाटा १, नगर तालुका ०२ अशा पाच जणांना बूथ रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोना मुक्त रुग्णांची संख्या ७८ झाली आहे.

Website Title: Ahmednagar Corona news today 11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here