Home अकोले संगमनेरात एक महिला व अडीच वर्षीय मुलास करोनाची लागण तर अकोले आणखी...

संगमनेरात एक महिला व अडीच वर्षीय मुलास करोनाची लागण तर अकोले आणखी एक जण

संगमनेर: संगमनेर शहरात आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. मोमीनपुरा येथील करोनाबधीताच्या संपर्कातील एका ३६ वर्षीय महिलेसह एका अडीच वर्षाच्या मुलाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज त्यांचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून हे दोघेजण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. संगमनेरची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात हॉटस्पॉट जारी करूनही रोज रुग्ण संख्या वाढत आहे. संगमनेरमध्ये सलग दहा दिवसांपासून रुग्ण आढळून येत आहेत.

अकोले तालुक्यात बोरी येथे अजून एक करोना बाधित ६० वर्षीय  महिला आढळून आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकूण संख्या १९ वर गेली आहे. अकोले तालुक्यात सकाळी सहा रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात सात रुग्ण मिळून आले आहेत. 

या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे.

Website Title: Sangamner Akole taluka Corona News update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here