Home संगमनेर संगमनेर तालुक्यात तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

संगमनेर तालुक्यात तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरातील शिंदोडी येथील एका तरुणाचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अजय रामदास कुदनर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अजय कुदनर शेततळ्याची मोटार चालू करण्यासाठी गेला होता. अजय घरी न परतल्यामुळे घरातील सदस्यांनी शोधाशोध सुरु केली. आसपास शोध घेत असताना अजयचा मृतदेह शेततळ्यातील पाण्यावर तरंगताना त्यांना दिसला. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले, वायाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तपासणीसाठी संगमनेर येथे कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. अजय शेततळ्याकडे मोटार चालू करण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबरीत म्हंटले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Website Title: Latest News youth drowned in a field in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here