Home अहमदनगर सासू-सासर्‍याने विवाहितेचे पाय पकडले अन् तोंडात ओतले फिनायल

सासू-सासर्‍याने विवाहितेचे पाय पकडले अन् तोंडात ओतले फिनायल

Ahmednagar Crime Mother-in-law grabbed the feet of the married woman

अहमदनगर | Ahmednagar Crime News: नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टेशनरोड वरील जयभीम हाऊसिंग सोसायटीमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे राहणाऱ्या 25 वर्षीय विवाहितेला सासू-सासरे आणि नवरा यांनी मारहाण करून तिला पकडून ठेवत तिच्या तोंडामध्ये फिनायल ओतल्याची घटना घडली आहे. यामुळे ही विवाहिता गंभीर झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच कोतवाली पोलिसांनी तिचा जबाब घेतला असता तिने सासरच्यांकडून आपणास वारंवार शिवीगाळ मारहाण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

कपडे धुण्याच्या कारणावरून पतीने मारहाण करत तिला जमिनीवर पाडले. त्यावेळी सासू-सासर्‍यांनी माझे पाय पकडून ठेवले. यावेळी पतीने माझ्या तोंडामध्ये फिनायल टाकून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार उपचार सुरू असलेल्या विवाहितेने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेत त्या आधारे विवाहितेचा पती दिनेश गौतम मेढे, सासु अनिता गौतम मेढे, सासरा गौतम मेढे राहणार जय भीम हौसिंग सोसायटी स्टेशन रोड अहमदनगर या तिघांवर  भारतीय दंड विधान कलम 307 328 498 323 504 506 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास कोतवाली पोलिस करत आहेत.

Web Title: Ahmednagar Crime Mother-in-law grabbed the feet of the married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here