Home अकोले जिल्ह्यात शेतक-यांना 3 लाखापर्यंतचे पिककर्ज 0% व्याजदराने

जिल्ह्यात शेतक-यांना 3 लाखापर्यंतचे पिककर्ज 0% व्याजदराने

अकोले (विद्याचंद्र सातपुते):  जिल्हा बँकेच्या 3 लाख रुपयापर्यंतचे पिककर्ज 0% व्याजदराचे निर्णयाचे भारतीय कम्युनिष्ट पक्षाकडून  स्वागत करण्यात आले असून बँकेचे अध्यक्ष  सिताराम पा.गायकर यांचा  सत्कार करण्यात आला.

अहमदनगर जिल्हा मध्य.सह.बँकेने अहमदनगर जिल्हयातील सर्व शेतक-यांना 3 लाखापर्यंतचे पिककर्ज 0% व्याजदराने देण्याचा नुकताच धाडसी निर्णय घेतला आहे. तसेच बँकेने वर्ग-2 च्या जमिनी असणा-या खातेदार शेतक-यांना सुध्दा शेतीचे कर्ज पुरवठा करण्याचा धाडसी व क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेने घेतलेल्या या धाडसी निर्णयांबद्दल अहमदनगर जिल्हा मध्य.सह.बँकेचे विद्यमान अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे अहमदनगर भारतीय कम्युनिष्ट पक्ष  व आखिल भारतीय किसान सभा, अहमदनगर यांचे वतीने  स्वागत केले. व गायकर यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे कायम संकटात असतो. अशा संकटाच्या काळात जिल्हा बँकेने वरील दोनही अत्यंत धाडसी निर्णय घेतलेले आहे. या निर्णयांमुळे शेतक-यांना आपल्या शेतीची चांगली व वेळेत मशागत करुन ऊत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच वर्ग- 2 च्या जमिनी असणारा शेतकरी विकासापासून दुर होता. राष्ट्रीयकृत व सहकारी बँका अशा शेतक-यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नव्हत्या. परंतु त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचे दृष्टीने जिल्हा बँकेने मोठे पाऊल ऊचलून त्यांनाही शेतीचे कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा बँक हि असा निर्णय घेणारी एकमेव बँक आहे. अहमदनगर जिल्हा बँक हि आशिया खंडामध्ये नावाजलेली बँक आहे. जिल्हा बँक नेहमीच शेतक-यांचे हिताचे निर्णय घेत असते. शेतक-यांचे हिताचे निर्णय घेतल्याने जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांचा नेते कॉ.कारभारी उगले, ऍ़ड.कॉ.शांताराम वाळुंज, कॉ.संतोष खोडदे, कॉ.सुधिर टोकेकर, कॉ.भारती न्यालपल्ली, ऍ़ड.कॉ.सुभाष पाटील लांडे, कॉ.बाबा अरगडे, कॉ.आझाद ठुबे, कॉ. आप्पासाहेब वागळे, कॉ.लक्ष्मण नवले, कॉ.एल.एम.डांगे, कॉ.बन्सी सातपूते, कॉ.आर.डी. चौधरी, कॉ.दशरथ हासे, कॉ.सुरेश पानसरे, कॉ.सिताराम लांबे, कॉ.सुधिर अदिक, कॉ.भगवान गायकवाड, कॉ.भारत अरगडे, कॉ.अशोक डुबे, कॉ.डी.एन.सहाणे, कॉ.निवृत्ती दातीर, कॉ.रमेश नागवडे, कॉ.बहिरनाथ वाकळे, कॉ.प्रा.विलास नवले यांनी  काल अगस्ति कारखान्यावर येऊन गायकर यांचा सत्कार केला. व त्यांना व संचालक मंडळाला धन्यवाद दिले.

शेतकरी संघटनेकडून सीताराम पाटील गायकर यांचा सत्कार

Sitaram Gaykar Akole

अहमदनगर जिल्हा मध्य.सह.बँकेने अहमदनगर जिल्हयातील सर्व शेतक-यांना रु.3 लाखापर्यंतचे पिककर्ज 0% व्याजदराने देण्याचा नुकताच धाडसी व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल अहमदनगर जिल्हा मध्य.सह.बँकेचे विद्यमान अध्यक्ष व अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे अहमदनगर जिल्हयातील सर्व शेतकरी व अकोले तालुका शेतकरी संघटना यांचे वतीने  अभिनंदन करण्यात आले.

जिल्हा बँकेने सिताराम पाटील गायकर यांचे नेतृत्वाखाली चांगली कामगिरी चालविली आहे. शेतकरी  दुष्काळ, अतिवृष्टी व आता कोरोना या आजारामुळे हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेने वरील अत्यंत धाडसी निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे जिल्हयातील असंख्य शेतक-यांना चांगला दिलासा मिळणार असून, शेतक-यांना आपली आर्थिक घडी सावरण्यास मदत होणार आहे. तसेच या निर्णयामुळे शेतक-यांना आपल्या शेतीची कामे वेळेत करता येतील व ऊत्पन्न वाढवण्यास मदत होईल. संपुर्ण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा सह.बँक ही असा धाडसी व क्रांतीकारी निर्णय घेणारी एकमेव बँक आहे. अहमदनगर जिल्हा बँक हि आशिया खंडामध्ये नावाजलेली बँक असून,  नेहमीच शेतक-यांचे हिताचे निर्णय घेत असते. शेतक-यांचे हिताचे निर्णय घेतल्याने जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर व संचालक मंडळाचे शेतकरी संघटनेचे अकोले तालुका अध्यक्ष शरद देशमुख,

ज्येष्ठ नेते अशोकराव आरोटे,सुनिल मालुंजकर, .हिरामण भोत, दत्तात्रय आग्रे, बाळासाहेब लोहटे, जालिंदर बंगाळ यांनी जाहिर अभिनंदन केले आहे. याप्रसंगी अगस्ति कारखान्याचे संचालक प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, कचरु पा. शेटे, अशोकराव देशमुख, महेशराव नवले,मच्छिंद्र धुमाळ, राजेद्र डावरे, बाळासाहेब ताजणे व कार्यकारी संचालक बी.एस.घुले ऊपस्थित होते.

Website Title: Ahmednagar District Bank Decision 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here