Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील आमदाराची पत्नीही करोना पॉझिटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यातील आमदाराची पत्नीही करोना पॉझिटिव्ह

Coronavirus/अहमदनगर:  काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका आमदाराचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यापाठोपाठ आता त्याच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दोघानाही दक्षता म्हणून मुंबई येथील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४१ रुग्ण आढळून आले. तर १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण करोना बाधितांची संख्या ६१८ इतकी झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील कुरण गावातील २२ जणांना करोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच गावात २२ रुग्ण आढळून येण्याची पहिलीच वेळ आहे. कुरणमधील रुग्णसंख्या ३१ वर पोहोचली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला फॉलो करताय ना? अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.   

Web Title: Coronavirus Ahmednagar The MLA’s wife is also positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here