Home अहमदनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी या नगरसेवकाची निवड

महापालिका स्थायी समिती सभापतीपदी या नगरसेवकाची निवड

Ahmednagar Election of this corporator as the Chairman

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगसेवक अविनाश घुले यांची बिनविरोध निवड

अहमदनगर | Ahmednagar:  महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगसेवक अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.  आज दुपारी ही निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी अविनाश घुले व सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी अर्ज दाखल केले होते. सेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी अर्ज माघारी घेतल्याने घुले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. शिवसेना नेत्यांच्या आदेशाने पठारे यांनी आपला अर्ज मागे घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Ahmednagar Election of this corporator as the Chairman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here