Home संगमनेर संगमनेर: डंपर दुचाकीत भीषण अपघात

संगमनेर: डंपर दुचाकीत भीषण अपघात

Sangamner Terrible accident in a dumper bike

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात कोल्हार घोटी रोडवर समनापूर येथील गणपती मंदिराजवळ भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात बुधवारी दुपारी चार ते साडे चार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

 अपघातात गंभीर झालेल्या तरुणांमध्ये एकाची प्रकृती खालाविल्याने त्याला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एकावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वडगाव येथील दोन तरुण सीडी डीलक्स या मोटारसायकलवरून वडगावकडून संगमनेरकडे येत असताना संगमनेरकडून वडगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात डंपरने या तरुणांच्या गाडीला सामोरासमोर धडक दिली.

या अपघातात अनिकेत गायकवाड वय २० व ऋतिक राजेंद्र गायकवाड वय १९ हे दोघे जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. जखमींना शहरातील कुटे हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र यातील अनिकेत गायकवाड यास गंभीर मार लागल्याने नाशिक येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.   

Web Title: Sangamner Terrible accident in a dumper bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here