Home अहमदनगर बाळ बोठे यास आणखी एक झटका, कोर्टाने दिला हा निर्णय

बाळ बोठे यास आणखी एक झटका, कोर्टाने दिला हा निर्णय

Another blow to Bal Bothe the court ruled

अहमदनगर | Bal Bothe: रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याचा मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे.

त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर संपाती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली आहे.

जरे हत्याकांड प्रकरणाला तीन महिने होऊन गेले आहेत तरीदेखील बोठे हा पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी  पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी गुरुवारी हा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आरोपी बोठे या याला कायदेशीररीत्या फरार घोषित करण्यात आले आहे.

पुढील कारवाई पोलीस सुरु करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. आदेशानुसार आरोपीला हजर होण्यासाठी १ महिन्याची मुदत असते. या कालावधीत पोलीस आरोपीची छायाचित्र सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून त्याला पकडून देण्याचे आवाहन शकतात. यातोपारी आरोपी हजर न झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु केली जाते. त्यासाठी न्यायालायात अर्ज करून पुन्हा परवानगी घेतली जाते. त्यामुळे आरोपीच्या नावावर असलेली संपाती जप्त करून बँक खाती सील करून पोलिसांचा मार्ग मोकळा होईल. यामुळे बाळ बोठेची आणखी कोंडी होणार आहे.

Web Title: Another blow to Bal Bothe the court ruled

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here