Home संगमनेर महसूल मंत्र्याच्या मुलीच्या नावाने फेक फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

महसूल मंत्र्याच्या मुलीच्या नावाने फेक फेसबुक खाते उघडून पैशाची मागणी

opening fake Facebook account in the name of Revenue Minister's daughter

संगमनेर | Sangamner: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट उघडून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी हे खाते बंद करून खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत डॉ. जयश्री यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून १ ते २ मार्च च्या कालावधीत रात्री १० वाजेच्या सुमारास या खात्याद्वारे संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली आहे. या फेसबुक पेजवर महसूलमंत्री बाळसाहेब थोरात व कन्या जयश्री यांचा फोटोचा वापर करत हा बनाव केला आहे. हे खाते त्वरित बंद करावे, याचा तपास करावा अशी मागणी सिद्धार्थ थोरात यांनी शहर पोलिसांकडे केली आहे. यामधील पैसे मागितल्याचे स्क्रीन शॉट पोलिसांकडे देण्यात आले आहे.  

Web Title: opening fake Facebook account in the name of Revenue Minister’s daughter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here