अहमदनगर अग्निकांड: चौघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
अहमदनगर | Ahmednagar: नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांचा जीव गेला होता. याप्रकरणातील दाखल गुन्ह्यातील चार जणांची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या चौघांच्या वतीने जामीन अर्ज केला होता. या अग्निकांड घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी नियुक्तीस असलेले डॉक्टर व नर्स यांचा हलगर्जीपणा पोलिसांच्या तपासात समोर आले होते. यांनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, अस्मा शेख आणि चन्ना आनंत यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
न्यायालयानेया चार जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने तपास अधिकारी संदीप मिटके यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एस. तिवारी यांच्यासमोर हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने चौघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Web Title: Ahmednagar fire Court rejects bail pleas of four