अण्णांचा संपाला पाठींबा: सरकारवर आणखी दबाव आणायला हवा
Anna Hazare : राज्यामध्ये गेल्या १५ दिवसांपासून एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठींबा दिला आहे. त्यांनी आपण प्रत्यक्षात संपात सहभागी होऊ शकत नसलो तरी कर्मचारीवर्ग मागणीला आपला पाठींबा असल्याचे अण्णांनी म्हंटले आहे.
एका एस. टी कर्मचाऱ्याने राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली आहे. सरकारवर आणखी दबाव वाढविण्याची सुचना यावेळी अण्णांनी कर्मचारी यांना केली आहे. एकीकडे भाजप नेते संपात सहभागी होत आहेत तर दुसातीकडे आता अण्णा हजारे यांनी संपातून सरकारवर दबाव टाकण्याचे सुचवलं आहे. अण्णा प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नाहीत मात्र तीव्र आंदोलन करण्याबाबत सुचना केल्या. तसेच एस. टी. कर्मचारी यांच्या वतीने आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारी दाखवली आहे. आत्तापर्यंत ३८ कर्मचारीवर्ग आत्महत्या करूनही सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही असे अण्णांनी म्हंटले आहे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही. मात्र आंदोलन शांततेने व अहिंसेच्या मार्गाने केले पाहिजे.
Web Title: more pressure government anna hazare support-msrtc st workers strike