Home अहमदनगर Rain | अहमदनगर: पहिल्याच पावसात या नदीला पुर

Rain | अहमदनगर: पहिल्याच पावसात या नदीला पुर

Ahmednagar first rain flooded the sina river

Ahmednagar | अहमदनगर: नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या दीड तासाच्या पहिल्याच पावसात (rain) सीना नदीला पुर आला आहे. पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना नदीला पुर येण्याची पहिलीच वेळ आहे.

या पावसाचे पाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत.

पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना नदीला महापूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले. नदीच्या पुराचे पाणी महामार्गावरील पुलावरुन गेल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

रस्त्याच्या दुतर्फा सुमारे आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचे कांदेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Ahmednagar first rain flooded the sina river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here