Home अहमदनगर Honey Trap: बहिण भावाने मिळून एका व्यक्तीला ओढले हनीट्रॅपच्या जाळ्यात

Honey Trap: बहिण भावाने मिळून एका व्यक्तीला ओढले हनीट्रॅपच्या जाळ्यात

Ahmednagar Honey Trap case Brother and Sister 

अहमदनगर | Ahmednagar: केडगाव येथील बहिण भावाने मिळून पनवेलच्या एका व्यक्तीला हनीट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लील फोटो तयार करून सोशियल मेडीयावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये व ३ तोळे सोन्याची चैन लुटल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत त्या व्यक्तीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पूजा कचरे व विक्रम कचरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. रभाजीनगर, केडगाव) यांच्याविरोधात कोतवाली पोलिसांनी जबरी चोरी, खंडणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा कचरे हिने फिर्यादीसोबत फोनवर गोड बोलून तिचा भाऊ विक्रम याच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याचे भासवून फिर्यादीकडून पाच लाख रूपये घेतले.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

फिर्यादी यांनी पूजाकडे पैशाची मागणी केली असता खोट्या गुन्ह्यात अडकून तसेच अश्लील फोटोचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांचा वाहनाचा चालक याला धक्काबुक्की करून जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चेन, दोन एटीएम काढून घेतले. पाच लाख रूपये दे, नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकून टाकू, अशी धमकी देण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar Honey Trap case Brother and Sister 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here