Home क्राईम Crime News: संगमनेरात दीड लाखांचा गुटखा पकडला, दोघांना अटक

Crime News: संगमनेरात दीड लाखांचा गुटखा पकडला, दोघांना अटक

Crime News Gutkha worth Rs 1.5 lakh seized at Sangamner

Crime News: संगमनेर: राज्यात गुटका बंदी सुरु आहे. संगमनेर शहरात एका वाहनातून येणारा १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा तसेच ३ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

जमील खलील शेख वय ३२ व खलील ताजमोहमद शेख वय ६२ रा. जोर्वे रोड ता. संगमनेर असे अटक केलेल्यांची नावे आहेत. 

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

हे दोघे जण नाशिकहून एका ओमिनी कारमध्ये १ लाख २७ हजार २०० रुपयांचा हिरा पान मसाला, ३१ हजार ८०० रुपयांची रॉयल तंबाखू असा मुद्देमाल घेऊन संगमनेरात येत होते. याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. सदर वाहन घुलेवाडी शिवारात पकडले. त्यांनी गुटका व ओमिनी कार असा एकूण ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेले पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने दोघे  जण मिळून आले. 

याबाबत पोलीस नाईक सचिन उगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहे.  

Web Title: Crime News Gutkha worth Rs 1.5 lakh seized at Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here