Home अहमदनगर तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरले, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

तिहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरले, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

Ahmednagar News:  शिर्डीजवळ (Shirdi) एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार.

Ahmednagar is rocked by triple murder, killing of three from the same family

अहमदनगर: जिल्ह्यातील शिर्डीजवळ एका गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी जवळ सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक महितीनुसार जावयाने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासू अशा तिघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. तर या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. दरम्यान कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आहे.

वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलीसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Ahmednagar is rocked by triple murder, killing of three from the same family

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here