Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील या मार्केटला आग, २० दुकाने खाक

अहमदनगर जिल्ह्यातील या मार्केटला आग, २० दुकाने खाक

 

Ahmednagar News Bhingar Nehru market Fire

अहमदनगर | Ahmednagar News: आज पहाटे भिंगार शहरातील शुक्रवार बाजार तळावरील नेहरू मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत  मार्केटमधील 24 पैकी 20 दुकाने जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज पहाटे साडेतीन वाजल्यानंतर ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे  आग लागल्याचे प्राथमिक माहिती समजते. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

शुक्रवार बाजारमध्ये आग लागण्याची माहिती मिळताच नियंत्रण कक्ष मार्फत एमआयडीसी, व्हीआरडीई, राहुरी, अहमदनगर, अशा अग्निशामक दलांना बोलाविण्यात आले. ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्यास संदेश देण्यात आला.

शहरातील पोलीस पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेत आग मी विझविण्याची कार्यवाही करण्यात आली. घटनास्थळी उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, शहरातील भिंगार, तोफखाना, कोतवाली, नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल, आरसीपी असे हजर होते.

Web Title: Ahmednagar News Bhingar Nehru market Fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here