Home अहमदनगर राज्यात २२ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल तर अहमदनगरसह ११ जिल्ह्यात निर्बंध कायम

राज्यात २२ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल तर अहमदनगरसह ११ जिल्ह्यात निर्बंध कायम

Ahmednagar News Break the chain lockdown continue 

अहमदनगर | Ahmednagar news: कोरोनामुळे उद्योग, व्यवसायावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादलेले असताना राज्यातील २२ जिल्ह्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या २ जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सरकारी आणि खासगी कार्यालय १०० टक्के उपस्थितीने चालू करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या ११ जिल्ह्यात मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मुंबईची लोकल सेवा काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांचा निर्णय डिझायस्टर विभागाकडून घेतला जाणार आहे.

टप्प्या टप्प्याने  निर्बंध कमी केले जातील त्यातून होणारे फायदे तोटे याचा अभ्यास केल्यावरच निर्बंध शिथिल करायचे की नाही याचा निर्णय होईल. मोकळीक कायम मिळू द्यायची असेल तर आपल्याला विना मास्क फिरता येणार नाही याची सर्वांनी जाणीव ठेवावी.  

Web Title: Ahmednagar News Break the chain lockdown continue 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here