Home अहमदनगर हॉटेलमालकाचे हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवत २५ तोळे सोने व अडीच लाख...

हॉटेलमालकाचे हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवत २५ तोळे सोने व अडीच लाख लांबविले

Ahmednagar News Fearing a knife, he took away 25 ounces of gold and 2.5 lakhs

शिर्डी | Ahmednagar News: शिर्डीतील हॉटेल व्यावसायिक व सुरक्षा एजन्सी चालकाच्या घरावर सहा ते सात चोरट्यांच्या टोळक्याने २५ तोळे सोने व अडीच लाखांची रक्कम चोरी करून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. आशिष अनिल गोंदकर वय ३ हरिओम बंगला नाला रोड सितानगर येथे ही घटना घडली.

आशिष यांचा वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय असून सुरक्षा रक्षक पुरविणारी एजन्सीही त्यांच्याकडे आहे. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा टोमीच्या सहायाने तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवून त्यांनी आशिषचे हातपाय बांधून ठेवले. अन्य दोन्ही वृद्ध महिलानाही धमकावून त्यांच्या अंगावरील सोने काढून घेतले. कपाटातील २५ तोळे सोने, तीन घड्याळे, दोन मोबाईल व अडीच लाखांची रोकड लुटून नेण्यात आली. दरोडेखोर हे २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी रुमालाने तोंड बांधलेले होते. ते मराठीत व हिंदीत बोलत होते. असे फिर्यादीत म्हंटले आहे. चोरटे गेल्यावर आशिषचे हातपाय सोडवले. यानंतर आशिष व त्याच्या मित्राने पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरवात केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Fearing a knife, he took away 25 ounces of gold and 2.5 lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here