Home अहमदनगर जिल्ह्यातील हे आमदार झाले कोरोना पॉझिटिव्ह, कार्यकर्त्यांत खळबळ

जिल्ह्यातील हे आमदार झाले कोरोना पॉझिटिव्ह, कार्यकर्त्यांत खळबळ

Ahmednagar News MLA Ashutosh kale Corona positive

अहमदनगर | Ahmednagar News: राज्यशासनाने गुरुवारी सायंकाळी श्री साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळ सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. १२ सदस्य नावांची यादी जाहीर होताच समाजमाध्यमातून अभिनंदन पोस्ट व्हायरल झाल्या. तसेच ११ विश्वस्त पदभार स्वीकारण्यासाठी शिर्डीत दाखल झाले. यावेळी अध्यक्ष आशुतोष काळे व विश्वस्त समर्थकांनी स्वागतासाठी गर्दी केली होती.

दरम्यान रविवारी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh kale) यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. अशो पोस्ट आमदार आशुतोष काळे यांनी केल्यामुळे समर्थकांत एकच धांदल उडाली आहे. श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

Web Title: Ahmednagar News MLA Ashutosh kale Corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here