Home अहमदनगर बंद टोल नाक्यावर वेगळेच धंदे सुरु पोलिसांना कळताच

बंद टोल नाक्यावर वेगळेच धंदे सुरु पोलिसांना कळताच

Ahmednagar News Separate trades started at closed toll plazas

अहमदनगर | Ahmednagar News: अनेक टोल नाके करार संपल्याने बंद आहेत. मात्र या ठिकाणी वेगळेच धंदे सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. नगर जामखेड रोडवर बंदटोलनाक्यावर चक्क गावठी पिस्तुल विक्रीचा धंदा सुरु होता. ग्राहकांना येथे येण्यास सांगून हत्याराची विक्री केली जात होती. नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकत दोघांना मुद्देमालासह अटक केली आहे.

नगर-जामखेड रोडवरील टाकळी काझी शिवारातील टोल नाक्याजवळ दोन तरुण गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती कटके यांना मिळाल्याने  कटके यांनी माहितीची खातरजमा केली. त्यानंतर तातडीने पोलिस पथक पाठविण्यात आले.

टोलनाक्यावर सध्या वेश्यात खासगी वाहनातून पोलीस पथक पाठविण्यात आले. टोल नाक्याच्या बाजूलाच बंद असलेल्या एका इमारतीत दोघे संशयास्पद आढळून आले. ते त्याठिकाणी टेहळणी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता संदीप पोपट गायकवाड, (वय ४० रा. जाबूत, ता. शिरुर, जि. पुणे) व भारत भगवान हतागळे (वय २५ रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करत  दोघांनाही अटक केली. ते दोघे ही शस्त्र तेथे विकण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली. आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Separate trades started at closed toll plazas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here