Home अहमदनगर मास्क का घातला नाहीस विचारल्यास पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

मास्क का घातला नाहीस विचारल्यास पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Crime News Police constable beaten with batons

श्रीरामपूर | Crime News: मास्क का घातला नाही अशी पोलीस हवालदाराने विचारणा केली असता याचाच राग येऊन पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कार्यरत असणारे पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर वय ५३ हे शुक्रवारी २ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशावरून दुकाने बंद करत असताना तेथे असलेले सोमनाथ भाऊराव कुदळे रा. अशोकनगर फाटा व बाळासाहेब निवृत्ती घोडे रा. महाकाळ वाडगाव याना खेडकर यांनी मास्क का घातले नाही असे विचारले असता याचाच राग आल्याने सोमनाथ कुदळे याने खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शर्टचे कॉलर पकडून बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावले. त्याचबरोबर बाळासाहेब घोडके याने शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकवून नोकरी घालवतो अशी धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी पोलीस हवालदार खेडकर यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कुदळे व घोडे यांना अटक केली आहे.   

Web Title: Crime News Police constable beaten with batons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here