Home अहमदनगर हृदयद्रावक: दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

हृदयद्रावक: दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

Ahmednagar News Today Two brothers drowned in river

राहुरी | Ahmednagar News today: राहुरी (Rahuri)येथील दोन सख्ख्या भावांचा मुळा नदीत बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. अमर पगारे व सुमित पगारे वय १२ असे मयत झालेल्या भावंडाची नावे आहेत,

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळा नदीवर पुलाजवळील गणपती घाटानजीक ५ जण पोहण्यासाठी गेले होते. यामधील अमर व सुमित पगारे या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक तरुणांनी तीन जणांना वाचविले मात्र दोघे पाण्यात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपालिकेचे पथक तातडीने अग्नीशामकसह दाखल झाले. बुडालेल्या दोन मुलांचा शोध सुरू आहे. नदीपात्रात सध्या मुळा धरणातून ८ हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. त्यातच वाळू उपशामुळे नदीपात्रात अधिक खोलीचे डोह तयार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Ahmednagar News Today Two brothers drowned in river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here