बनावट धनादेशाद्वारे दोघा जणांनी केली ८९ लाखांची फसवणूक
अहमदनगर | Ahmednagar: बनावट धनादेश वाटवून नंतर पैसे काढून घेतल्याने सुमारे ८९ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन खातेदारांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप मांगीलाल कोठारी रा. नालेगाव व संगीत विठ्ठल गावडे रा. सावेडी, नगर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे अधिक तपास करीत आहेत.
याप्रकरणी बँक ऑफ बडोदाच्या सावेडी शाखा वरिष्ठ शाखाधिकारी संजय डोंगरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. वरील दोघांनी बिहारमधील छापरा येथील जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नावाने बँक ऑफ बडोदा शाखेचे ४७ लाख व ४२ लाख रुपयांचे असे दोन एकूण ८९ लाख रुपयांचे चेक बँकेच्या सावेडी शाखेत वटवीण्यात आले. नंतर ही रक्कम खात्यावर जमा झाल्यावर एटीएम मधून एकूण ८९ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यातील ९ लाख रुपये स्वतः जवळ ठेवले व ८० लाख रुपये बिहारमधील श्रावण नावाच्या व्यक्तीला देण्यात आले. त्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे.
Web Title: Ahmednagar persons cheated Rs 89 lakh through fake checks