Home संगमनेर संगमनेर शहरातील घटना: गर्भाशय शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू

संगमनेर शहरातील घटना: गर्भाशय शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू

Sangamner Woman dies during uterine surgery

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील एका महिलेचा शहरातील भोलाणे हॉस्पिटल येथे गर्भाश्याच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी आरोप करीत संताप व्यक्त केला मात्र डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थितीतून हा वाद मिटला.

याबाबत अधिक महिती अशी की, तालुक्यातील बिरेवाडी येथील संगीता अंकुश पठारे ह्या शहरातील भोलाणे हॉस्पिटलमध्ये गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. तिला भूल देण्यात आली. त्यांनतर ती बेशुद्ध झाली. तिच्यावर अधिक उपचार करण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला.

तिच्या मृत्यूची माहिती मिळताच बिरेवाडी येथील नातेवाईक रुग्णालयात आले. डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे संगीता ही मृत्यु झाला असा आरोप नातेवाईक यांच्याकडून करण्यात आला. रुग्णालयातील गोंधळ पाहून पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मयताच्या नातेवाईक व डॉक्टरांशी चर्चा केली. नातेवाईक व डॉक्टर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आमची दवाखान्यासंदर्भात कोणतीही तक्रार राहिली नाही असे नातेवाईक यांनी सांगितले. मृतदेह ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक साबळे हे अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Sangamner Woman dies during uterine surgery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here