Home संगमनेर संगमनेर तालुक्यात पुन्हा करोना रुग्णांच्या गतीत वाढ

संगमनेर तालुक्यात पुन्हा करोना रुग्णांच्या गतीत वाढ

Sangamner Taluka again increased Corona 

संगमनेर | Sangamner: तालुक्यात पुन्हा एकदा रुग्ण संख्यावाढून गुरुवारी 46 बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या 279 रुग्ण उपचार घेत आहे. एकूण बाधितांची संख्या 5 हजार 75 इतकी झाली आहे.

गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात स्वामी समर्थ नगर 16 वर्षीय तरुण, शिवाजीनगर येथील 62 वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथील 65 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 20 वर्षीय तरुणी, सह्याद्री महाविद्यालय जवळ 46, 46 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 55 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 60, 37 वर्षीय पुरुष, पुणे नाक्यावर 50 वर्षीय पुरुष, संगमनेर 48 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

तर तालुक्यातून पिंपरणे येथे 50 वर्षीय पुरुष, कनोली येथे 37 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे 52 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय पुरुष, 66,35 वर्षीय महिला, वाघापूर येथे 58 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 62 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 62,50 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 27 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 42 पुरुष, मंगळापूर येथे 55 वर्षीय महिला, सोनुशी येथे 23 वर्षीय पुरुष, आश्वी बु. येथील 69 वर्षीय पुरुष, चिखली येथील 53,35 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालिका, 40 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, जोर्वे येथे 31 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 52 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथे 65 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय बालिका, खंदरमाळ येथे 32 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 62 वर्षीय पुरुष, खळी येथे 53 वर्षीय पुरुष, घारगाव येथे  35 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 53 वर्षीय पुरुष, चिकणी येथील 38 वर्षीय पुरुष अशा जणांना करोनाची लागण झाली आहे.  तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 5 हजार 75 इतकी झाली आहे.  

Web Title: Sangamner Taluka again increased Corona 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here