Home कोपरगाव MNS: मनसेने केली वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

MNS: मनसेने केली वीज वितरण कार्यालयाची तोडफोड

Kopargaon MNS vandalizes power distribution office

कोपरगाव | Kopargaon: मनसे च्या वतीने राज्यभरातून गुरुवारी वाढीव वीज बिलाविरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोपरगावातील वीज वितरण कार्यालयात जाऊन आंदोलन केले. त्यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन कार्यालयाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या दालनाची व खुर्च्यांची तोडफोड केली आहे.

अनेक निवेदन देऊन शासनाला जाग येत नसल्याने जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असे मनसे पदाधिकारी यांनी सांगितले.

तोडफोड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, उपनिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच मनसे पदाधिकार्यांना ताब्यात घेतले.

मनसेचे उप जिल्हा प्रमुख संतोष गंगवाल, तालुका प्रमुख अनिल गायकवाड, तालुका मार्गदर्शक सुनील फंड तसेच अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kopargaon MNS vandalizes power distribution office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here