Home अहमदनगर नगर: कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात केली तोडफोड

नगर: कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात केली तोडफोड

Ahmednagar Relatives vandalized the hospital after Corona died

अहमदनगर | Ahmednagar: नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली आहे. अतिदक्षता विभागाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना बाहेर काढले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.  तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात जाऊन तोडफोडीचा पंचनामा केला आहे. डॉक्टरांनी फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल होईल असे तोफखाना पोलिसांनी सांगितले आहे.

नगरमध्ये बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. साडे तीन हजारांच्या वर रुग्णसंख्या आढळून येत आहे. सुमारे १९ हजारांच्या दरम्यान रुग्णांवर उपचार सुरु असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत उपचार होत नसल्याबाबत तक्रारी होत्या, धरणे आंदोलन केली जात होती मात्र आता थेट तोडफोडीची घटना समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे.    

Web Title: Ahmednagar Relatives vandalized the hospital after Corona died

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here