Home संगमनेर संगमनेर तालुक्यात शेततळ्यात बेवारस व्यक्तीचा आढळला मृतदेह

संगमनेर तालुक्यात शेततळ्यात बेवारस व्यक्तीचा आढळला मृतदेह

Body of an unidentified person was found in a farm in Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील बिरोबा वस्ती हद्दीत जया गिरीश तळोले यांच्या शेतातील शेततळ्यात रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ३० ते ३५ वय असलेला अनोळखी बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

सदर मृतदेह हा कुजलेला अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून त्याचा शेतातच अंत्यविधी केला. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेची संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यावेळी पोलिसांना पोलीस पाटील विनोद साळवे, मंजाबापू साळवे, साहेबराव राहिंज, अरुण राहिंज, बबलू रकटे यांनी मदत केली. सदर व्यक्ती हा कोण होता. त्याचा घातपात झाला की अकस्मात मृत्यू यामागील कारण मिळाले नसल्याने परिसरात एकच चारच होती.

Web Title: Body of an unidentified person was found in a farm in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here