Home अहमदनगर Ahmednagar ब्रेकिंग: नगरमध्ये एस टी वाहकाचा मृत्यू

Ahmednagar ब्रेकिंग: नगरमध्ये एस टी वाहकाचा मृत्यू

 

Ahmednagar ST carrier dies in town

अहमदनगर|Ahmedagar: नगरमध्ये ५ ते ६ दिवसांपासून घरीच उपोषणास बसलेल्या एका एसटी कर्मचार्‍याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. विजय महादेव राठोड (वय 46 रा. बुर्‍हाणनगर ता. नगर, मुळ रा. वांगुज ता. आष्टी जि. बीड) असे मयत  कर्मचार्‍याचे नाव आहे. विजय राठोड हे कल्याण आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर संप सुरू आहे. राठोडही या संपात सहभागी झाले होते. त्यांनी नगर शहरातील तारकपूर  येथील संपात सहभाग घेतला होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते उपाशी होते. रविवारी ते नगर जवळील मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Web Title: Ahmednagar ST carrier dies in town

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here