Home अहमदनगर राज्यातील मंत्री तुपाशी आणि जनता उपाशी: विखे पाटील

राज्यातील मंत्री तुपाशी आणि जनता उपाशी: विखे पाटील

Ahmednagar State Minister Tupashi and Janata Upashi

शिर्डी | Ahmednagar: केंद्रसरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. आता महाविकास आघाडी सरकार राज्याचे शुल्क कमी करते की राज्यातील मंत्री तुपाशी व जनता उपाशी ही स्थिती कायम राहणार का असा सवाल भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

लोणी येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत विखे पाटील व पत्नी शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विखे पाटील म्हणाले महाविकास आघाडीचे सरकार केंद्राकडे बोटे दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम मंत्री करत आहे. जनतेला लस, मोफत धान्य केंद्रसरकारने दिले आहे. कोविड मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. आता राज्यसरकारने पाच लाखांची मदत द्यावी.

Web Title: Ahmednagar State Minister Tupashi and Janata Upashi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here