Home अकोले अकोले ब्रेकिंग: चालू ढंपर मधून २ टन लोखंडी प्लेट अंगावर पडून ९...

अकोले ब्रेकिंग: चालू ढंपर मधून २ टन लोखंडी प्लेट अंगावर पडून ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

Akole Accident A 9-year-old boy was seriously injured when a 2 ton iron plate fell

Akole Accident | अकोले: अकोले तालुक्यातील निंब्रळ येथे चालू ढंपर मधून लोखंडी २ टनाचे प्लेट अंगावर पडल्याने रस्त्याने जात असलेला ९ वर्षाचा शुभम कैलास पथवे हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

शुभम हा मुलगा शेतातून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात (Accident) घडला आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ढंपरच्या दिशेने धाव घेत शुभमच्या अंगावर पडलेली लखंडी प्लेट काढून तातडीने मेहेंदुरी येथील चासकर यांच्या दवाखान्यात नेले, मात्र शुभमला जास्त गंभीर इजा झाली असल्याने त्याला, पुढील उपचारासाठी संगमनेरला हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सदर ढंपर हा निळवंडे कँनोलच्या लोखंडी प्लेटा दुसर्या ठिकानी नेत असतांना चालू गाडीतून लोखंडी २ टनाची प्लेट शुभम या लहान मुलाच्या अंगावर पडली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकानचे ढंपर चालक एका ढंपरमध्ये ४ ते ५ लोखंडी प्लेटा वाहत असतात, साधारण दोन टनाची एक प्लेट असते, स्थानिक नागरिकांना सत्याच्या बाजूने हे ढंपर जात असतांना प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण होते असते, त्यामुळे या ठेकेदारावर तसेच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

शुभम पथवे हा आदिवासी समाजातील गरिब कुटुंबातील मुलगा आहे, त्यात घरची परिस्थिती ही हालाकीची आहे, त्यात हा अपघात घडल्याने पथवे कुटुंब अडचणीत सापडले आहे.

Web Title: Akole Accident A 9-year-old boy was seriously injured when a 2 ton iron plate fell

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here