Home Accident News अकोलेतील घटना: कालव्यात ट्रॅक्टर पलटी; चालकाचा मृत्यू

अकोलेतील घटना: कालव्यात ट्रॅक्टर पलटी; चालकाचा मृत्यू

Akole Accident News:  म्हाळादेवी  येथे निळवंडे कालव्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना.

Akole Accident Tractor overturns in canal Death of the driver

अकोले:  अकोले तालुक्यातील म्हाळादेवी  येथे निळवंडे कालव्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) चालकाचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे.  विजय गणपत हासे (वय 45) असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

म्हाळादेवी येथील शेतकरी विजय हासे हे सकाळी दर्यातील शेताची नांगरणी करण्यासाठी गेलेले होते. तेथील काम उरकल्यानंतर ते घराकडे निळवंडे कालव्याच्या  रस्त्याने येत होते. त्याचवेळी त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट कालव्यात पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली चालक विजय हासे दबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आले.

अकोले पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल म्हाळादेवी सह परिसरात शोककळा पसरली आहे. मयत विजय हासे यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Akole Accident Tractor overturns in canal Death of the driver

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here