Home महाराष्ट्र साखरपुडा झाला, लग्न जवळ आले पण… हॉटेलच्या खोलीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

साखरपुडा झाला, लग्न जवळ आले पण… हॉटेलच्या खोलीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह

हॉटेलच्या बंद खोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह(Dead body), मृत्यूने पोलीस दलात खळबळ.

dead body of the policeman was found in the hotel room

यवतमाळ: हॉटेलच्या बंद खोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळमध्ये या खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या दत्त चौकात असलेल्या हॉटेल मकरंदमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मृतदेह कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला.

मंगीलाल चव्हाण असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मंगीलाल यांची नुकतीच वडगाव जंगल पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती.  त्यांचा विवाहसुद्धा ठरला होता. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आता त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान मंगीलाल चव्हाण हे रविवारी हॉटेल मकरंदमध्ये मुक्कामी थांबला होते. मात्र सकाळी त्यांचा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृत मांगीलाल यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title: dead body of the policeman was found in the hotel room

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here