Home अकोले अकोले: कालवा विहीर तुटल्याने आढळेचा डावा कालवा बंद

अकोले: कालवा विहीर तुटल्याने आढळेचा डावा कालवा बंद

अकोले: कालवा विहीर तुटल्याने आढळेचा डावा कालवा बंद करण्यात आला आहे. उजवा जल सेतुही धोक्यात आल्याने आढळा धरणांतील अधिकचे पावसाळी पाणी कालव्यावाटे सोडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. अकोले तालुक्यातील देवठानचे आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांतून पाणी सोडण्यात आले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डाव्या कालव्यात पाणी प्रवाहातील हवेचा दाब नियंत्रणासाठी असलेली विहीर तुटली त्यामुळे डावा कालवा बंद झाला आहे.

पाणी प्रवाह सुरु झाल्यानंतर डाव्या कालव्यातून पाणी लाभक्षेत्रात आठ किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले होते. विहिरीशेजारी असलेला मातीचा भराव पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तुटला आणि विहिरीवर कोसळल्याने पाणीप्रवाहात अडथळा निर्माण झाला. जलसंपदा खात्याने पाणीप्रवाहात आलेला अडथळा दूर करण्याची तातडीने मोहीम घेतल्याची माहिती संबंधितांना दिली.

उजव्या कालव्याचाही धरणाजवळील जलसेतूहि डोक्यात असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शनी सांगितले. २०० मीटर लांब आणि १८ मीटर उंचीचा हा जलसेतू धरणनिर्मिती म्हणजे १९७२-१९७६ या कालावधीचा आहे. जीर्ण झालेल्या या जलसेतुलाही अनेक ठिकाणी गळती सुरु झाली आहे. बांधकाम पक्के दिसत असले तरीही थोडेसे दुर्लक्षही आगामी आवर्तनासाठी धोकादायक ठरू शकते. या जलसेतूला धोका झाल्यास आगामी आवर्तनच बंद होईल असे लाभक्षेत्रातील शेतकर्यांचे म्हणणे आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  

Website Title: Akole Adhala Dam Close the left canal 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here