राजूर: बस झाली दुनियादारी चला जपुया आदिवासी संस्कृती सारी: प्रा. घिगे बी. एस.
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर गावातील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर जुनिअर कॉलेजमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. घिगे बी. एस. यांनी केले. या कार्यक्रमात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे पुजन व वंदन करून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. घिगे बी. एस. यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुलांना संबोधीत करताना ते म्हंटले की, जागतिक आदिवासी दिवस ही संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे महत्वाचे वाटेल अन्यथा वेळ जाते आणि तसाच दिवस सुद्धा जाईल. परंतु असे जर घडले तर मग तो एक आदिवासी म्हणून आपला पराभव असेल. आपण आज अनेक सन मोठ्या थाटामाटात साजरे करतो. कडी काळी निसर्ग पूजक असणारे आदिवासी आज गणपती उत्सव सुद्धा मोठ्या आपलेपणाने साजरे करतात. जर आपले मुलनिवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती आणि अस्मिता, समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता खरच बस झाली दुनियादारी चला जपुया आदिवासी संस्कृती सारी! अशा शब्दात त्यांनी मुलांच्या आत्मविश्वासात भर घातली. तसेच या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम. डी. यांनी श्री. घिगे बी. एस यांचा सत्कार करत शुभेच्चा देण्यात आल्या.या कार्यक्रामच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उप प्राचार्य श्री. पर्बत एल. पी. होते. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. यांनी आपल्या भाषणातून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या कार्याचा गुणगौरव करत अभिवादन केले. आदिवासी दिनाचे औचित्य साधत प्रा. तुपाविहीरे एस. व्ही. यांनी आपल्या भाषणातून आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याबरोबरच हा गरीब समाज गरिबीच्या विलाख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक आदिवासीने क्रांतीकारी कार्य केले पाहिजे.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री. ताजणे बी. एन.,श्री. बुऱ्हाडे डी. जी. , श्रीमती.सावंत बी.व्ही. श्री. तारू व्ही. टी. श्री. शेटे सुरेश श्री. अजित गुंजाळ, कु. चासकर अविज्ञा आदी सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार श्री. मढवई आर. आर. यांनी मानले.
Website Title: SVM Rajur Adivasi Day