Home अकोले अकोले : अकोलेत रस्ते चिखलमय; गुडघाभर चिखलातून मार्ग काढण्याची नागरिकांवर वेळ

अकोले : अकोलेत रस्ते चिखलमय; गुडघाभर चिखलातून मार्ग काढण्याची नागरिकांवर वेळ

अकोले : शहरातील सीड फार्म परिसरात अकोले नगरपंचायत पाणीपुरवठा पंप हाऊसकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. प्रवरानदी काठावर विद्यूत पंप चालू करण्यासाठी जाणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना गुढगाभर गाळातून कसरत करून जावे लागत आहे.

या रस्त्यावर नगरपंचायत प्रशासनाने मुरूम टाकावा, अशी मागणी बीज गुणन केंद्र परिसरातील रहिवाशांनी केली आहे. या पंप हाऊसवर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या परिसरातील शेतकरी व नगरपंचायतीलचे पाणीपुरवठा कर्मचारी यांना या रस्त्याने जाणे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.गुडघाभर चिखलातून मार्ग काढत  या रस्त्याचा वापर या परिसरातील नागरिक करत आहेत. नगरपंचायतीकडे वेळोवेळी मुरूम टाकण्याची मागणी केली जात आहे.

Website Title: Latest News Akole : Acolyte Muddy Roads; Time On Citizens To Make Their Way Through The Mud

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here