Home Uncategorized भंडारदरा परिसरात अतिवृष्टीने भात पिकांचे नुकसान

भंडारदरा परिसरात अतिवृष्टीने भात पिकांचे नुकसान

भंडारदरा : भंडारदरा परिसरात अतिव्ष्टीने भात पिकांचे नुकसान झाले आहे. भातखाचराचे बांध फुटले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग व महसूल विभागामार्फत पेंडशेत गावात सुरू करण्यात आले आहेत. अतिवृष्टीने घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

भंडारदरा, घाटघर हा परिसर डोंगरदऱ्यांनी वेढलेला भाग आहे. डोंगर उतारावर भातखाचर तयार केलेली असतात. भात हे येथील प्रमुख पिक आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या परिसरात अतिवृष्टी होत असल्याने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. भात खाचरात पाणी साठल्याने शेतीचे बांध फुटले आहेत. तर काही भातपिके पाण्याखाली असल्याने नष्ट झाली आहेत. भाऊराव नामदेव पदमेरे, नामदेव तुळशीराम पदमेरे, यांच्या घरांची भिंती पडल्या आहेत. झालेल्या नुसकानींचे पंचनामे पेंडशेत येथे करण्यासाठी कृषी सहायक ठोकळ मॅडम, महसूल विभागाचे तलाठी साळवे तात्या, गा्रमविस्तार अधिकारी गभाले भाऊसाहेब, पेंडशेत गावच्या सरपंच विमलताई पदमेरे, उपसरपंच कृष्णा खाडे, पोलीस पाटील पंढरीनाथ खाडगीर, परशुराम पदमेरे उपस्थित होते.

Website Title: Latest News Damage To Paddy Crops Due To Heavy Rainfall In Bhandardara Area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here